शेतकरी प्रशिक्षण व क्षेत्र दिन कार्यक्रम अजलसोंडे व फुलगाव येथे संपन्न. कृषी विज्ञान केंद्र पाल चा उपक्रम

पाल

शेतकरी प्रशिक्षण व क्षेत्र दिन कार्यक्रम अजलसोंडे व फुलगाव येथे संपन्न. कृषी विज्ञान केंद्र पाल चा उपक्रम
शेतकरी प्रशिक्षण व क्षेत्र दिन कार्यक्रम अजलसोंडे व फुलगाव येथे संपन्न. कृषी विज्ञान केंद्र पाल चा उपक्रम

पाल ता. रावेर- कृषी विज्ञान केंद्र पाल मार्फत भुसावळ तालुक्यातील अजलसोंडे व फुलगाव येथे राष्ट्रीय सुरक्षा अभियान सन 2021 -22 अंतर्गत खरीप हंगामातील सोयाबीन पिकावरील समूह पंक्ति प्रथम दर्शनी पीक प्रात्याक्षिक प्रकल्प राबवण्यात आले असता या प्रकल्पाच्या माध्यमातून एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात आला एकूण 25 एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेण्यात आली असता त्यानिमित्त शेतकरी प्रशिक्षण व क्षेत्र दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी लाभार्थी शेतकऱ्यांना बियाणे बीज प्रक्रिया साठी जिवाणू खते कीड नियंत्रणासाठी कीटकनाशके तसेच पिवळे चिकट सापळे हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आले होते तरी एकात्मिक पीक व्यवस्थापन केल्याने उत्पादनात समाधान कारक वाढ होईल असे मत सुरेश चौधरी यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून आपले मत शेतकऱ्यांसमोर मांडले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष  सुरेश चौधरी तसेच गावातील कृषी मित्र नितिन पाटील कृषी विज्ञान केंद्र पाल येथील प्रमुख शास्त्रज्ञ महेश महाजन यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याबाबत चर्चा करत असताना पिक सोयाबीन वाण फुले संगम या वाणाचे झाड आणुन एका झाडाला लागलेल्या शेंगांची संख्या १०० ते ११० अशी दिसून आली. जास्तीत जास्त शेंगा दिसून आल्या तरी शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिले. व यापुढे नवीन तंत्रज्ञान स्वीकारून आपले उत्पादन कसे वाढवता येईल असे मत शेतकऱ्यांसमोर मांडले कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व गावातील लाभार्थी व शेतकरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार युवराज कोळी यांनी केले