आपल्याला सर्वप्रथम भारतीय स्वातंत्रादिवस सुवर्ण महैत्सवी ७५ व्या वर्धापन दिनाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा!

      सुमारे गेल्या ३० वर्षापासून विविध दैनिक व साप्ताहिकातुन वृत्तपत्र क्षेत्रात कार्य करीत आसतांना आम्ही नव्याने 'रावेर

विकास' या न्युज पोर्टल, इलेक्ट्रॉनिक न्युज पोर्टल या क्षेत्रात आज आपल्या आतापर्यंतच्या सहकार्याच्या जोरावर  पदार्पण करीत आहोत.
     गेल्या पाच वर्षापूर्वी आपल्या भागातून नियमित चालणा-या साप्ताहिक रावेर विकास चा आपण शुभारंभ केला होता. या कार्यकाळात आपण अपवाद वगळता आपल्या सहकार्याने साप्ताहिक रावेर विकास नियमित अंक प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला. या कामी आपण बातम्या, लेखात्मक लिखाण याबरोबरच जाहिराती देवून सहकार्य केले. त्या साठी मनापासून खुप खुप धन्यवाद...
     गेल्या दोन वर्षापासून कोविड च्या महामारीचा आपल्या संर्वावर कमी आधिक परिणाम झाला आहे. यात तर काहिंचे जिवलग गेल्याने मोठे नुकसानच झाले. त्यावेळी त्यांचे कुटूंबिय कोसळलेल्या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न अजुनही करीत आहेत. तसेच या काळात नोकरी, व्यवसाय, शेती, शिक्षण, या सह आनेक क्षेत्रात फटका बसला याचा परिणाम थेट प्रत्येकावर कमी आधिक प्रमाणात झाला. त्यातुनही आपल्या सर्वांना   सावरण्याचे बळ मिळो अशी अपेक्षा व्यक्त करु या...
      भारतीय स्वातंत्रादिवस ७४ व्या वर्धापन दिवस व साप्ताहिक रावेर विकास पाचव्या वर्धापन दिना निमित्ताने आम्ही आज १५ ऑगस्ट २०२१ रोजी
 'रावेर विकास' या न्यूज पोर्टल चा शुभारंभ करीत आहोत ज्या प्रमाणे नियमित व वेगळे काही देण्याच्या प्रयत्नातील साप्ताहिक रावेर विकास हे आपल्या भागासाठी आपले हक्काचे व्यासपिठ ठरले. त्या प्रमाणेच प्रिंट मिडीया सोबतच इलेक्ट्रॉनिक न्युज पोर्टल क्षेत्रात आम्ही पदार्पण करीत आहोत. रावेर विकास न्यूज पोर्टल च्या माध्यमातून काही वेळातच ती घडामोड आपल्या पर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न आसेल. या बरोबरच नवनविन काही वाचनिय व आपल्या उपयोगाचे, विचारात व माहितीपर लिखाण फोटो  देण्याचा आमचा प्रयत्न आसेल. 
       वाचक, माहितीपर लिखाण लेख देणारे, जाहिरातदार, वृत्तपत्र विक्रते, हितचिंतक, स्नेही  व साप्ताहिक रावेर विकास परिवारातील सर्व सहकारी यांचे वेळोवेळीच्या सहकार्याने आतापर्यंत ची ही खडतर वाटचाल आम्ही करू शकलो. 
     माहिती व तंत्रज्ञानक्षेत्रात वेगळे काही देण्याच्या आमच्या या प्रयत्नाला आपले भरभरून सहकार्य 
मिळावे अशी नम्र पुर्वक विनंती...      
     आपले खुप खुप धन्यवाद....

  आपलाच
       सुनील चौधरी
संपादक, साप्ताहिक रावेर विकास
     व रावेर विकास न्युज पोर्टल
सर्व रावेर विकास परिवार, गृप सहकारी