हॉटेल मॅनेजमेंट - हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील अनोखी संधी

gokul mahajan इंजि.-गोकुळ-वि.-महाजन-एम.-टेक.-केमिकल-इंजिनिअरिंग,---वाघोड-ता.-रावेर

हॉटेल मॅनेजमेंट -  हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील अनोखी संधी

नाविन्यपूर्ण असं काहीतरी करण्याची इच्छा  असलेल्या तेही खासकरून व्यवस्थापन क्षेत्रात, तर हॉटेल मॅनेजमेंट हा अतिशय सक्षम पर्याय आहे. हॉटेल मॅनेजमेंट हे क्षेत्र करिअरसाठी चांगल्या संधी देणारं आहे. तुम्हाला हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात खरंच रस असेल, तर तुम्ही नक्कीच हॉटेल मॅनेजमेंट कोर्सला प्रवेश घेऊ शकता . या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. जेईईच्या अधिक माहितीसाठी www.nchmct.org या वेबसाइटला भेट द्या. तर एमएएच एचएम सीईटीच्या अधिक माहितीसाठी www.dte.org.in या वेबसाइटला भेट द्या.
या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना प्रयोगशाळांत प्रात्यक्षिकाद्वारे अन्नपदार्थ निर्मिती, शीतपेय निर्मिती, फ्रंट ऑफिससेवा, हाऊसकीपिंग आदी गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याचप्रमाणे हॉटेल अकाऊंटिंग, अन्नाची सुरक्षा आणि गुणवत्ता, मनुष्यबळ विकास, फॅसिलिटी मॅनेजमेंट, फायनान्शिअल मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, टुरिझम मार्केटिंग अँड मॅनेजमेंट यासारख्या व्यवस्थापकीय स्किलचं प्रशिक्षणदेखील अभ्यासक्रमात अंतर्भूत आहे.
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतून बारावी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण असलेले विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी पात्र असतात.