चाहुल बांप्पाच्या आगमनाची...

रावेर ( प्रतिनिधी ) -

यंदाचा गणेशोत्सव १० सप्टेंबर पासुन सुरु होत आहे. कोरोना च्या पार्श्वभुमीवर गत वर्षा प्रमाणे यंदाही मागील नियमांचे पालन करीत १९ | सप्टेंबर अनंत चतुरर्दशी पर्यंत १० दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 

      गत वर्षा प्रमाणेच यंदाही मुर्ती विक्री बाबत ४ फुटाची मर्यादा, पियुपी, रंगा सह अन्य वस्तुंचे वाढलेले भाव व व्यवसायातील अन्य अडचणी मुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाला असल्याचे बुरहानपूर मोरे आर्ट चे सुनील मोरे यांनी सांगीतले. कमी प्रमाणात सध्या मुर्ती ची बुकिंग आहे. मात्र आमचे नेहमीचे ग्राहकां कडून ऐनवेळीही खरेदी होईल. रावेर येथे सुमारे सहा वर्षापासुन येथे काम करीत आसुन सुरवातीला २०ते २५ वर सहका-यांच्या साह्याने चालणारे हे काम आता ४ ते ५ जणांवर आले आहे. विविध आडचणी या व्यवसायात येत आसल्यातरी ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आसल्याचे त्यानी सांगीतले.

    दरम्यान कोरोनाचे रुग्ण तालुक्यात गेल्या दीड महिन्यांपासून नाही .जळगाव जिल्हयातही नगण्य आहे .जिल्ह्यातील कोरोना सदृष्य स्थिती चांगली असतांना मागील निकष या वर्षी ही लागू असल्यामुळे मुर्तिची उंची,स्थापना व श्री विसर्जन मिरवणूक यावर बंदी असल्यामुळे भविकांचा सलग दूस-या वर्षी ही हिरमोड झाला आहे .