उद्योजक श्रीरामदादा पाटील यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा सह विविध कार्यक्रमाचे आयोजन

Raver

रावेर (प्रतिनिधी)  - शून्यातून विश्व निर्माण केलेले. जन सामान्य माणसापर्यंत पोहोचून अडल्यानडल्या ची तत्परतेने सेवा करणारे द्रष्ट व्यक्तिमत्व व शेतकऱ्यांचे कैवारी, यशस्वी उद्योजक श्रीरामदादा पाटील यांच्या 50 व्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन मित्र परिवारातर्फे रावेर येथे करण्यात आले आहे. 

  येथील श्रीराम मॅक्रो व्हिजन अॅकडमी, सावदा रोड रावेर येथे दि २६ ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. रंजनाताई प्रल्हाद पाटील, रुग्णवाहिका लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री आ.गिरीश महाजन, खासदार रक्षाताई खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार शिरीष दादा चौधरी, यासह जिल्ह्यातील आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा, जिल्ह मध्यवर्ती बँकेचे संचालक, जिल्हा परिषद सभापती व सदस्य, जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती उपसभापती सदस्य, तसेच नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, उद्योजक तसेच कृषी, सामाजिक, राजकीय, शिक्षण, उद्योग क्षेत्रातील व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते या सह परिसरातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

   अभिष्टचिंतन सोहळा व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन श्रीरामदादा पाटील मित्र परिवार यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.